Sunday, May 19, 2024
Homeकृषीआंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वारा व विजांसह जोरदार पाऊस

आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वारा व विजांसह जोरदार पाऊस


आंबेगाव (दि.२९) :
आंबेगाव तालुक्यात  अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. आंबेगाव च्या पूर्व व मध्य  परिसरात सायं.५ नंतर अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारा व विजांसह पावसाने आगमन केल्यामुळे अनेक शेती पिकांना याचा फटका बसलेला आहे.

आज आंबेगाव तालुक्यात मंचर,घोडेगाव ,शिनोली ,डिंभे या सह पश्चिम आदिवासी भागात सायंकाळनंतर पावसाला अचानक सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसाने शहरी भागाला झोडपून काढले.मात्र सोबतच पश्चिम आदिवासी भागात वादळी वारे ठिकठिकाणी झाले. झालेल्या या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे काही प्रमाणात हवेतही गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हा नंतर सुखद गारवा मिळाला. परंतु अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय