Friday, November 22, 2024
HomeहवामानSouth india : दक्षिण भारतात भीषण पाणी टंचाई

South india : दक्षिण भारतात भीषण पाणी टंचाई

South india : यावर्षी उष्णतेची लाट संपूर्ण देशभर पसरलेली असतानाच पाण्याची टंचाईही सुरू झाली आहे. विशेषत: दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भीषण पाणी संकट उभे ठाकले आहे. (South india)

दक्षिण भारतात केवळ १७ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली. पावसाळा सुरू व्हायला आणखी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. South india news

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्ये पाणी टंचाईमुळे त्रस्त झाली आहेत. केंद्रीय जल आयोगाने गुरुवारी दक्षिण भारतातील जलसाठ्याची माहिती जारी केली. या आयोगाच्या अंतर्गत ४२ जलाशय असून त्यांची क्षमता ५३.३३४ अब्ज घनमीटर आहे. आता या जलाशयात केवळ ८.८६५ अब्ज घनमीटर पाणी उरले आहे. म्हणजेच एकूण क्षमतेच्या केवळ १७ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.गेल्यावर्षी दक्षिण भारतातील पाण्याचा साठा २९ टक्के होता, तर दहा वर्षांतील सरासरी पाण्याचा साठा २३ टक्के होता.

दक्षिण भारतातील जलाशयातील पाणीसाठा कमी होण्याचे कारण म्हणजे, या राज्यात पाण्याचे कमी होत चाललेले प्रमाण व सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा आहेत. यातून पिण्याचे पाणी व वीज निर्मिती यावर मोठा परिणाम होणार आहे.

कर्नाटकमधील सहा जिल्ह्यांमध्ये उष्णेतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणीचे तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

कर्नाटकातील बेंगळुरू, बागलकोट, बेळगावी, धारवाड, गदग, हावेरी आणि कोप्पल या जिल्ह्यांमध्ये १ मे ते ९ मे दरम्यान तापमान ४० ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत राहिल, असे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार आहे.

दक्षिण भारताने कमाल तापमानाच्या बाबतीत दुसरा-उष्ण एप्रिल अनुभवला, तर पूर्व आणि ईशान्य भारतातील सरासरी सरासरी तापमान 51 वर्षांतील महिन्यातील सर्वाधिक होते.
तीव्र उष्णतेने अनेक प्रमुख शहरांमध्ये प्रदीर्घ काळातील रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. बेंगळुरूने एप्रिलमधील सर्वात उष्णतेचा साक्षीदार होता, सलग सहा दिवसांसह 13 अत्यंत उष्ण दिवसांची नोंद केली.

तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश मंगळवारी सरासरी तापमान ४३ अंश नोंदवले गेले, जे एप्रिलचे सर्वोच्च तापमान आणि कोणत्याही महिन्यातील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान आहे.

तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात शेतकरी दुष्काळाने हैराण झाले आहेत, येथील औद्यगिक शहरात भीषण पाणी टंचाई आहे. मागील तीन वर्षातील सर्वात जास्त तापमान वाढीने येथे उचांक गाठला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

ब्रेकिंग : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल

ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

संबंधित लेख

लोकप्रिय