Sunday, April 28, 2024
Homeराज्यमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान...

मुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ‘ही’ चूक करत असाल तर सावधान !

पुणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागेल.

शासन परिपत्रक क्र.एसटीसी -1099 / प्र.क्र .31 / का -10 दि .12 / 01 / 2000 महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.एसटीसी -1099 / प्र.क्र .31 / का -10 दि .12 / 01 / 2000 च्या परिपत्रकानुसार अनुसुचीत जमातीच्या व्यक्तींना जातीचा दाखला देताना हिंदू – भिल , हिंदू – ठाकुर , हिंदू – कोकणी , हिंदू – वारली , हिंदू – कातकरी , हिंदू – कोळी महादेव असा उल्लेख करुन दाखला दिला जातो या नोंदी शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये सर्वसाधारणपणे आढळून येतात. या नोंदीचाच उल्लेख जातीच्या दाखल्यात करण्यात येत असतो. अशा प्रकारे नोंदी करुन जो जातीचा दाखला दिला जातो तो दाखला वैध समजला जात नाही.

त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले असतानाही असे प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आणून देऊन शासन परिपत्रकाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय