Friday, March 29, 2024
Homeग्रामीणजुन्नर : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बांगरवाडी येथे दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यशाळा...

जुन्नर : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बांगरवाडी येथे दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यशाळा संपन्न

जुन्नर : प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्ताने जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी येथे दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

बांगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच जालिंदर बांगर,  प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण व अरूण शेरकर, ज्ञानदेव बांगर, स्वप्नवेध अनाथालयचे सचिन भोजणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बांगरवाडी व परिसरातील दिव्यांग, विधवा, निराधार, परित्यक्ता व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बांगरवाडी ग्रामपंचायत हद्दीत लोकांना सरपंच जालिंदर बांगर यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी 5% निधी जीएसटी बिलांची मागणी न करता थेट दिव्यांग व्यक्तींच्या बॅक खात्यात प्रत्येकी अकराशे रूपये जमा करण्यात आले. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही भेट दिली तसेच या पुढे दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही कामात अडचणी आल्यास मदत करण्याचे व शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा दिव्यांग व्यक्तींना मिळून देण्याचे आश्वासन सरपंच बांगर यांनी दिले. 

दिव्यांगांना पहिल्यांदा जीएसटीची अट न लावता 5 % निधी देणारी पहिली ग्रामपंचायत आहे. कार्यशाळे मध्ये अनेक दिव्यांग लोकांनी अध्यक्षा समोर आपल्या अडचणी मांडल्या. २०१९ पासून जिल्हा परिषदेकडून दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह भत्ता व दुर्धर आजार याचे 3/3 वेळा अर्ज भरून दिला तरी सुद्धा दिव्यांग लोकांना पैसे जमा झाले नाही.  घरकुल, संजय गांधी पेन्शन, व्यवसाय करीता २०० स्केअर फुट जागा व जिल्हा परिषद कडून मिळणाऱ्या विविध योजना साहित्य मिळावेत, अशी विनंती देखील करण्यात आली.

या कार्यक्रमात विठ्ठल बिचा, बबन रोकडे, संभाजी  रोकडे, बाबूजी बांगर, नंदा बोरचाटे, हीराबाई बांगर, दगडू बांगर, शांताराम पाटील, नंदु चव्हाण, सविता चव्हाण, व सर्व प्रहार सेवक उपस्थितीत होते. यावेळी  ज्ञानदेव बांगर यांनी सर्व पदाधिकारी व उपस्थितांचे आभार मानले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय