Saturday, May 11, 2024
Homeराजकारणमंत्रीपद मिळताच ज्योतिरादित्य सिंधिया यांचा त्यांच्याच सोशल मीडिया अकाउंटवर मोदी विरोधातील व्हिडीओ...

मंत्रीपद मिळताच ज्योतिरादित्य सिंधिया यांचा त्यांच्याच सोशल मीडिया अकाउंटवर मोदी विरोधातील व्हिडीओ पोस्ट

नवी दिल्ली : नुकताच केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी एकूण ४३ जणांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही मोदींच्या मंत्री मंडळात स्थान भेटले. या शपथ विधी नंतर काही तासातच ज्योतिरादित्य सिंधिया यांचा त्यांच्याच सोशल मीडिया अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील व्हिडीओ व्हायरल झाला.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर त्यांच्या फेसबुक वॉलवरुन रात्री १२.२३ वाजता पंतप्रधान मोदींविरोधातील आक्रमक भाषण केलेला जुना व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

ज्यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसमध्ये होते, त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. मात्र, हा व्हिडीओ सिंधिया यांनी नव्हे तर कोणी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अकाउंटवरुन अपलोड केला असल्याचे समोर आले. अर्थात त्यांचे हे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आले होते. मात्र, काही मिनिटांतच सायबर टीमने हे हॅकिंग थांबवलं.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय