Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यानिमित्ताने उमेदवार आणि पक्षांकडून सभांचा सपाटा सुरू आहे. कोल्हापुरात ही लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. अशात एका सभेत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक विधान केल आहे. याची सध्या राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू आहे.
कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून संजय मंडलिक लढत आहेत. कागलमध्ये महायुतीची सभा पार पडली. या सभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी हेलिकॉप्टरने माणसं आणू पण संजय मंडलिक यांना विजयी करू. आता देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असं विधान मुश्रीफ यांनी केलं. मुश्रीफ यांच्या या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून राजकीय वर्तुळातून पडसाद उमटत आहेत.
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी “बडे लोग, बडी बाते” असं म्हणत टोला लगावला आहे. तर जयंत पाटील यांनी आमच्या विरोधांकडे मोठं घबाड असल्याचं म्हटलं आहे. काही नेत्यांनी तर मुश्रीफ यांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार
कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल
आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!
बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार
भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड
ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!
कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती