Sunday, May 5, 2024
Homeजिल्हाKolhapur : ७-८ जणांनी मिळून एकाचा खून केला, काही तासातच आरोपी जेरबंद

Kolhapur : ७-८ जणांनी मिळून एकाचा खून केला, काही तासातच आरोपी जेरबंद

Kolhapur / यश रुकडीकर : गुरुवार दि.४ रोजी रंकाळा टॉवर येथे वर्चस्ववादाच्या उद्देशाने ७-८ जणांनी मिळून एकाचा खून केला. या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने करत काही तासातच आरोपींना जेरबंद केले.

सध्या वर्चस्ववादाच्या अनेक घटना कोल्हापूर (Kolhapur) शहर व उपनगरात दिसून येत आहे. आणि या वर्चस्ववादाच्या जाळ्यात अल्पवयीन मुलांची संख्या लक्षणीय आहे. पिक्चर मधे दाखवल्या प्रमाणे आपणही स्वतःची दहशत निर्माण करून भागात नाव मिळवावं या उद्देशाने तरुण हातात शस्त्र घेत धिंगाणा घालतात. गुरुवारी झालेल्या अजय शिंदेच्या खुनामुळे तर कोल्हापूर जिल्हा भितीच्या सावटाखाली येईल का काय अशी भीती मनाला लागून राहिली. सायं.५.३० च्या सुमारास ७-८ जणांच्या टोळक्याने अजय उर्फ रावण दगडू शिंदे, वय २५, रा. डवरी वसाहत, यादव नगर, कोल्हापूर (Kolhapur) याचा निर्घृण खून केला. आजूबाजूचा लोकांनी आरडा ओरडा करताच वाहतूक शाखेचे पोलिस तिथे आले. हे बघताच ह्या आरोपींनी तेथून पळ काढला. ह्या खुनाचा वेगाने तपास करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या.

या गुन्हाचा तपास चालू असताना शाखेकडील पोलीस अंमलदार अमर आडूळकर व प्रविण पाटील यांनी अचूक माहिती घेत वेळीच ७ आरोपींना इस्पूर्ली येथून तर आणखी एकाला सायबर चौकात अटक केली. चौकशी वेळी त्यांची नावे १) राज संजय जगताप,वय २१, रा. डवरी वसाहत,सायबर चौक २) आकाश आनंदा माळी, वय २१, रा. बालींगा, ता.करवीर, ३) सचिन दिलीप माळी, वय १८, रा.डवरी वसाहत, सायबर चौक, ४) रोहित अर्जुन शिंदे, वय २०, रा. डवरी वसाहत, यादव नगर,५) निलेश उत्तम माळी, वय २१, रा.डवरी वसाहत, यादव नगर, ६) गणेश सागर माळी, वय.१८, रा.डवरी वसाहत, यादव नगर, ७) प्रशांत संभाजी शिंदे, रा. बिड शेड, ता.करवीर, निलेश बाबर, रा.डवरी वसाहत, यादव नगर अशी असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे व पुढील तपास पोलीस करत आहे.

सदर कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहा.पो. नि सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संदिप जाधव यांच्या पथकाने केली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड

ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय