Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणपेण मधील चिमुकलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमांला फाशी द्या - राजेंद्र...

पेण मधील चिमुकलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमांला फाशी द्या – राजेंद्र पाडवी

सांगली : देशात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ ‘अभियान सुरु असतांना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र  राज्यातील रायगड जिल्ह्यामधील पेण या ठिकाणी ३४ वर्षाच्या नराधमाने ३ वर्षाच्या चिमुकल्या मुलींला घरातून उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या नराधमाने तिची हत्या केली. या नराधमांला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी  बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांच्याकडे ई-मेल निवदेनाद्वारे केली आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. पेण शहरानजीकच्या खाजगी हायस्कूलजवळ पांचोळा आदिवासी वाडी आहे. या आदिवासी वस्तीमधील तीन वर्षाच्या चिमुकलीला बुधवार दि.३० डिसेंबर ला पहाटेच्या सुमारास तिच्या घरातून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. आणि त्यानंतर तिची हत्या केली.

   

या मुलीला जलदगतीने न्याय मिळावा म्हणून सदर प्रकरण फास्ट ट्रँक कोर्टात चालवून बलात्कार करुन हत्या करणा-या नराधमास फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वी सुद्धा आदिवासी मुली आणि महिलांवर अन्याय, अत्याचार झालेले आहेत.

देशात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कठोर केलेला असतांनाही दिवसेंदिवस  अत्याचार वाढत असून आदिवासी सुरक्षित नसल्याचे या घटना साक्ष देतात. त्यामुळे अत्याचारा संदर्भातील सर्व खटले फास्ट ट्रक कोर्टात चालविण्यात यावे व जलदगतीने न्याय देण्यात यावा अशी मागणी बिरसा क्रांती दल आणि इतर संघटनांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय