Monday, May 6, 2024
Homeआरोग्यकोरोनामोठी बातमी : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही...

मोठी बातमी : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही कोरोनाच्या लशींना DGCI ची मान्यता

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर झायड्स कॅडिलाची लस ‘झायकोव्ह-डी’ च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची पत्रकार परिषद आज दुपारी 11 वाजता पार पडली. 

 

 DGCI चे बी जी सोमानी यांनी ही घोषणा केली. याआधी भारतातील तज्ज्ञांच्या समितीने या दोन्ही लशींच्या वापरासाठी मंजूरी दिली होती. नव्या वर्षात 1 जानेवारी रोजी सीरमच्या कोविशिल्ड लशीला मान्यता देण्यात आली होती तर 2 जानेवारी रोजी कोव्हॅक्सिनला तज्ज्ञांकडून ही मान्यता देण्यात आली होती.

याबाबत बोलताना DCGI चे बी जी सोमानी यांनी म्हटलं की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडेदेखील धोकादायक असलेलं आम्ही काहीही मंजूर करणार नाही. या लशी 100 % सुरक्षित आहेत. सौम्य ताप येणे, वेदना होणे आणि ऍलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य असतात. जर यावरुन लोक असंयम दाखवत असतील तर हे चुकीचं आहे.

देशातील तीन लस निर्मिती कंपन्यांनी लशीच्या आपात्कालीन मंजुरीसाठी अर्ज केले होते. यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाद्वारे निर्माण केली जाणारी कोविशिल्ड आणि भारत बायोटेक आणि आयसीएमआर ICMR द्वारे विकसित कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. फायझर-बायोएनटेकच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. फायझरने आपला डाटा देण्यासाठी तज्ज्ञ समितीला आणखी काही दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर फायझरच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय