पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.२२ – लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने भोसरी येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी अध्यक्ष रामेश्वर बोंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे जान्हवी खटन, लितीका खटन तसेच क्लबचे अध्यक्ष कैलास भांगरे, क्लबचे पदाधिकारी प्रकाश शहापूरकर, निलेश नारखेडे, रामेश्वर बोंगाळे अण्णा मटाले, संताजीराव मोहिते, सुनील कुलकर्णी, सुनील पाटे – पाटील, नागराज शेरेगार तसेच मुख्याध्यापक लालासाहेब साळुंखे, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
या चित्रकला स्पर्धेत पाचवी ते दहावी पर्यंतच्या १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मध्ये विद्यार्थ्यांनी चांद्रयान वृक्षारोपण, राष्ट्रीय सण, निसर्ग चित्र, गणपती उत्सव या विषयावर चित्रे काढली होती. पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गातील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आणि सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व खाऊवाटप करण्यात आले. प्रास्ताविक रामेश्वर बोंगाळे, स्वागत प्रकाश शहापूरकर, सूत्र संचालन शरद खोपडे तर आभार लालासाहेब साळुंखे यांनी मानले.
हे ही वाचा :
पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड
ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’
डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’
हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर