Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणजागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्ताने सीटू कार्यालयात शहिद क्रांतिकारकांना अभिवादन...

जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्ताने सीटू कार्यालयात शहिद क्रांतिकारकांना अभिवादन !

नांदेड : एक मे दिना निमित्ताने सीटू कार्यालयात शहीद स्मारकास अभिवादन करून महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. कोविड – १९ काळात निधन झालेल्या सर्व ज्ञात अज्ञात निरपराध लोकांना भावपूर्ण आदरांजली वाहून शहीद क्रांतिकारी वीर जवानांना अभिवादन करण्यात आले.

सिटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड म्हणाले, सिटू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपालांना निवेदन देऊन राज्य, केंद्र व स्थानिक पातळीवरील मागण्याचे निवेदन देण्यात आले.

तसेच  आयकर न भरणा-या प्रत्येक व्यक्तीस दरमहा किमान ७५०० रूपये सरकारने केरळच्या धर्तीवर सुरू करावेत. रेशन मोफत देऊन त्या मध्ये मीठ, मिरची, गॕस, गहू, तांदूळ, डाळीसह इतर १६ जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करावा, आशा व गट प्रवर्तकांंना कोविड भत्ता स्वरूपात प्रतिदिन ३०० रूपये प्रोत्साहन भत्ता सुरू करावा, नांदेड रेल्वे स्टेशन सफाईदार कामगारांच्या ॲटॉसीटी प्रकरणातील मुख्य आरोपी आर.मंगाचार्यलू आणि एस.के.वल्ली यांचे एफआयआर मधील नावे दोषारोप पत्रात समाविष्ट करून तत्कालीन तपास अधिकारी उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, नांदेड स्वारातीम विद्यापीठातील टेंडर समाप्त झालेल्या वादग्रस्त सीआयएसबी व गोदावरी एन्टरप्रायजेस सफाई कामगार पुरवठा करणाऱ्या कंपनीस काळ्या यादीत टाकून तातडीने सर्व सफाई कामगारांना कामगार कायदा कलम दहा प्रमाणे कायम करावे, श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

यावेळी सीटू जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.शेख, मगदूम पाशा, कॉ.दत्तोपंत इंगळे, कॉ.लत्ता गायकवाड, कॉ.छायाताई निळकंठे हे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय