Monday, May 6, 2024
Homeआरोग्यधक्कादायक : अदर पुनावाला यांना मुख्यमंत्री, उद्योगपतींचे धमकीचे फोन ; ते शीर...

धक्कादायक : अदर पुनावाला यांना मुख्यमंत्री, उद्योगपतींचे धमकीचे फोन ; ते शीर कलम करतील

मुंबई : कोविशिल्‍ड या कोरोनावरील लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांना धमक्‍यांचे फोन येत आहे. टाईम्‍स यूकेला दिलेल्‍या मुलाखतीत त्‍यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. 

‘टाइम्स यूके’ ला मुलाखत देताना त्यांनी म्हटले आहे की, मला देशातील मोठ- मोठे लोक मला सातत्याने फोन करीत आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक उद्योगपती अशा मोठ्या लोकांकडून सतत धमक्यांचे फोन कॉल येत आहेत. ‘मी खरे बोललो तर माझे शीर कलम करण्यात येईल, अशी भीती मला वाटत आहे. असेही पुनावाला यांनी आपल्या मुलाखती मध्ये म्हटले आहे.

करोना लसीच्या निर्मितीमुळे जगभरामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसी मिळण्याकरिता विनंती आणि मागणी करण्यात येत आहे. अशातच देशातील अनेक बड्या व्यक्‍तींकडून कोविशिल्‍ड लसीसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अदर पुनावाला सध्या लंडनमध्ये आहेत. या कॉल्‍समुळे सध्यातरी मी भारतात परण्याच्या विचारात नसल्‍याचे देखील त्‍यांनी म्‍हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय