Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयदरवर्षी खात्यात येणार १ लाख रुपये, LIC ची जबरदस्त योजना

दरवर्षी खात्यात येणार १ लाख रुपये, LIC ची जबरदस्त योजना


पुणे :
प्रत्येक जण आपल्या भवितव्याबद्दल काळजीत असतो, कोरोना साथीच्या काळापासून ही चिंता आणखीच वाढलीय. जमा असलेल्या पैशांचा उपयोग करूनही लोक आपल्या प्रियजनांचा जीव वाचवू शकत नाहीयेत. अशा परिस्थितीत निश्चित उत्पन्न नसलेल्या लोकांची तर बरीच अडचण होत आहे. आपणास देखील निश्चित उत्पन्न मिळावे, अशी तुमची इच्छा असल्यास आज एलआयसी या सरकारी कंपनीच्या विशेष योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला दरवर्षी एक लाख रुपयांची निश्चित रक्कम मिळणे सुरू राहील. 

एलआयसीची नवीन जीवन शांती पलिसी ही एक पेन्शन योजना

वास्तविक एलआयसीची नवीन जीवन शांती पॉलिसी ही एक पेन्शन योजना आहे. आपण आपल्या भविष्यासाठी तिची सुरुवात करू शकता. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे त्यात पॉलिसीधारकास दरवर्षी किंवा दरमहा एक निश्चित रक्कम मिळते. या १५पॉलिसीमध्ये आपल्याला पेन्शन त्वरित किंवा ५, १०,१५ आणि २० वर्षांनंतर सुरू करण्याचा पर्याय आहे.

अशा प्रकारे दरवर्षी १.०५  लाख रुपये मिळतील

समजा तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी एलआयसीची जीवन शांती पॉलिसी सुरू केली, तर २० वर्षांनंतर आपण निवृत्तीवेतन सेट करू शकता. या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला वार्षिक आधारावर पेन्शन म्हणून २१.६ टक्के व्याज मिळेल. या पॉलिसीमध्ये तुम्ही पाच लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर २० वर्षांनंतर तुम्हाला दरवर्षी १.५ लाख रुपये पेन्शनच्या स्वरूपात मिळणार आहेत. आपण आपल्या पेन्शनची रक्कम ५, १० किंवा १५ वर्षांनंतरही सुरू करू शकता, परंतु त्यामध्ये परतावा कमी असेल.

या सुविधा पॉलिसीमध्ये देखील उपलब्ध

या योजनेतील ठराविक कालावधीनंतर काही प्रमाणात पैसे जमा होणे सुरू होते. ३० ते ८५ वर्षे वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीवर कर्जदेखील घेतले जाऊ शकते. आपल्याला या पॉलिसीत कोणतीही समस्या दिसत असल्यास आपण ३ महिन्यांनंतर त्यास सरेंडर करू शकता. पॉलिसी सुरू झाल्यानंतर एक ते २० वर्षांच्या दरम्यान कधीही निवृत्तीवेतन सुरू केले जाऊ शकते. परंतु येथे हे लक्षात घ्यावे लागेल की, आपण पॉलिसी घेताना निवडलेला पर्याय नंतर बदलू शकत नाही.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय