बेळगाव : पावसाळ्याच्या हंगामात निसर्गरम्य गोकाक धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. गोकाक धबधबा हा कर्नाटक राज्यातील बेलगावी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा गोकाक नदीवर आहे आणि त्याची उंची सुमारे १७१ फूट आहे. गोकाक धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा आकाराने आणि रूपाने नायगारा धबधब्याप्रमाणे दिसतो, म्हणूनच याला “मिनी नायगारा” असेही म्हणतात. (Gokak fall)
गोकाक धबधब्याजवळ एक सुंदर निसर्गरम्य परिसर आहे, ज्यामुळे पर्यटक आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करतो. या धबधब्याच्या आसपास अनेक प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात योग्य काळ म्हणजे पावसाळा, कारण या काळात धबधब्याचा प्रवाह अधिक जोरात आणि सुंदर असतो.
सध्या आंबोलीसह पश्चिम घाटमाथ्यावर होणाऱ्या संततधार पावसामुळे घटप्रभा नदीला पूर येऊन बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे.दररोज या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भारतातील शेकडो पर्यटकांचे आगमन सुरू झाले आहे. (Gokak fall)
चंदगड, आजरा, आंबोली परिसरात संततधार पावसाने ताम्रपर्णी, घटप्रभा, चित्री, हिरण्यकेशी नद्यांना पूर येऊन सध्या ताम्रपर्णी, घटप्रभा नदीचे पाणी हिडकल जलाशयात अडविले जात आहे. चित्रीचेही पाणी अडविले असले तरी हिरण्यकेशी नदीचे पाणी घटप्रभा नदीद्वारे गोकाकच्या धबधब्यावरून कोसळत आहे. हे अतिशय निसर्गरम्य दृश्य गोकाका धबधबा पाहताना दिसत आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल