Thursday, November 21, 2024
Homeराष्ट्रीयGlobemaster : भारतीय हवाई दलाची सी-17 महाकाय विमाने, ग्लोबमास्टर (video)

Globemaster : भारतीय हवाई दलाची सी-17 महाकाय विमाने, ग्लोबमास्टर (video)

बोईंग सी-17 ग्लोबमास्टर हे मोठ्या क्षमतेचे सैनिकी मालवाहू विमान आहे. मॅकडोनेल डग्लस या कंपनीने (आता बोईंगचा एक भाग) या विमानाची रचना 1980 व 1990 च्या दशकात अमेरिकन वायुसेनेसाठी केली. आता बोईंग कंपनी ही विमाने तयार करून अमेरिकेबरोबरच युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कतार, संयुक्त अरब अमिराती, नाटो तसेच भारत या काही निवडक देशाकडे ही महप्रचंड विमाने आहेत. (Globemaster)

अमेरिकेत तयार झालेल्या या विमानाच्या काही गोष्टी अतिशय खास आहेत. त्यामुळे हे विमान जगातील इतर मालवाहू विमानांपेक्षा आणखीन उजवं ठरतं.

53 मीटर लांबी आणि विंग्जसहित 51 मीटर रुंदी असलेलं हे विमान जगातील सर्वात मोठं विमान आहे. हे विमान 28,000 फूट उंचीवरून उड्डाण करू शकतं. एकदा इंधन भरल्यानंतर ते 2,400 मैल म्हणजेच 3,862 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतं.
हे विमान 3,500 मीटरच्या छोट्या हवाईपट्टीवर देखील उतरवता येतं आणि त्याच्या क्रूमध्ये तीन सदस्य असतात. (Globemaster)

बोईंग C-17 ग्लोबमास्टर हे जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानापैकी एक आहे. ग्लोबमास्टर कारगिल, लडाख आणि इतर उत्तर आणि ईशान्य सीमांसारख्या कठीण ठिकाणी सहज उतरू शकते. याशिवाय लँडिंगमध्ये अडचण आल्यास रिव्हर्स गिअरही देण्यात आला आहे. विमान चार इंजिनांनी सुसज्ज आहे. 81 व्या स्क्वाड्रनच्या ग्रुप कॅप्टनला ‘गोल्डन की’ देऊन हे विमान भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले आहे. या स्क्वाड्रनचे नाव स्कायलॉर्ड्स असे आहे.

हवाई दलाच्या सी-17 ग्लोबमास्टर या विमानाचा वापर प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती अथवा आपत्कालीन प्रसंगी मदत पुरवठा करण्यासाठी केला जातो.

नैसर्गिक आपत्तीवेळी मानवतावादी मदतीसाठी सी-१७ ग्लोबमास्टरचा वापर आधीपासून केला जातो. यागी चक्रीवादळामुळे व्हिएतनामला पुराचा मोठा फटका बसल्यानंतर त्या ठिकाणी मदत पोहोचविण्यासाठी या विमानाचा हवाई दलाने वापर केला होता. हवाई दलाच्या हिंडन तळावरूनच या मदत मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.

अमेरिकेकडून भारताने खरेदी केली आहेत ही विमाने 70 टनांची क्षमता असलेले सी-17 मालवाहू विमान ‘ग्लोबमास्टर’ भारताने 2011 मध्ये अमेरिकेकडून विकत घेतले आहेत.

अवजड रणगाडे आणि उपकरणांना सीमेवर लगेच पोहोचविण्याचे काम या विमानांच्या माध्यमातून केले जाते. या विमानातून शेकडो लोक एकवेळी प्रवास करु शकतात.
युद्ध जन्य परिस्थितीत परदेशातून भारतीय नागरिकांना तातडीने स्वदेशात आणण्यासाठी या विमानांचा वापर केला जातो.

तसेच मोठ्या प्रमाणात सैन्याची हालचाल करण्यासाठी अवजड यंत्रसामुग्री आणणे किंवा पूरग्रस्त ठिकाणी लोकांचा बचाव करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. भारतीय हवाई दलाकडे अशी 11 मोठी विमाने आहेत.
भारतीय नौदलाच्या मोठ्या जहाजावर ही विमाने उतरवता येतात.

संबंधित लेख

लोकप्रिय