Tuesday, November 12, 2024
Homeताज्या बातम्यामहायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा

महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा

Mahayuti Govt : राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून ‘लाडकी बहीण योजना’ लागू असताना, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन नवीन घोषणा केल्या आहेत. महिलांना आता पार्ट-टाईम नोकरीसह 11,000 रुपये मासिक पगार मिळणार आहे. (Mahayuti Govt)

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, सरकार महिलांना टाटा कंपनीत चार तासांचा पार्ट-टाईम जॉब देणार असून, यासोबतच त्यांना एक वेळचे जेवण आणि नाश्ता देखील मिळणार आहे.येत्या 1 नोव्हेंबरपासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तर, 11 हजार मासिक वेतन असणारी नोकरी देणार अशी दुसरी घोषणा त्यांनी महिलांसाठी केली आहे. महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. (Mahayuti Govt)

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार पार्ट टाईम जॉब ते निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील. 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री.

मी या निमित्ताने त्यांचं नाव सांगेन. दुर्दैवाने नुकतंच त्यांचं निधन झालं.स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये मासिक वेतन असणारी थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुण्यातील कोथरूडमध्ये झालेल्या महाकन्या पूजन कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी या दोन घोषणा करून महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी सरकारकडून या योजना राबविण्यात येत आहेत, ज्यामुळे महिलांना त्यांच्या घराच्या जबाबदाऱ्या आणि काम एकत्र सांभाळता येईल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर

नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू

मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन

युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

संबंधित लेख

लोकप्रिय