Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणपाण्यासाठी आदिवासींना जागा द्या बिरसा फायटर्सची मागणी

पाण्यासाठी आदिवासींना जागा द्या बिरसा फायटर्सची मागणी

दापोली : ग्रामपंचायत कांगवई व पंचायत समिती दापोली तर्फे आदिवासी वाडीतील लोकांकरिता पाण्यासाठी जागेची सोय करण्यात यावी, या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दापोलीचे तहसीलदार यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, दापोली तालुक्यातील गांव कांगवई येथील शेताचे स्थानिक नाव सूर्यवंशीचे पाणी या ठिकाणी ग्रामपंचायत कांगवई तर्फे पाण्याची तळी व पाखाडीचे शासकीय काम झालेले असून सदर जागा ओहोळात आहे. या पाण्याच्या तळीतील पाणी आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या पाणी पित आहेत. परंतु तेथे पाण्यासाठी अडचण निर्माण झाली असून आदिवासी लोकांच्या नावे कोणत्याही मालकीची जागा नाही. त्यामुळे 15 वा वित्त आयोग सन 2021 – 2022 पंचायत समिती स्तर अंतर्गत दुरूस्तीसाठी मंजूरी झालेले 7.50 लाख रूपये परत जाण्याची शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

आदिवासी वाडीतील लोकांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामपंचायत कांगवई व पंचायत समिती दापोली मार्फत अद्यापही पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. हे निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष संदिप पवार, माजी पंचायत समिती सदस्य काळूराम वाघमारे, अशोक गणपत पवार, अशोक दामोदर पवार, शुभांगी वाघमारे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय