Sunday, April 28, 2024
Homeजिल्हाजुन्नर : गणपत घोडे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव पदी निवड...

जुन्नर : गणपत घोडे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव पदी निवड !

माकपच्या अधिवेशनात जुन्नर तालूक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायात समितीच्या चार जागा लढण्याचा निर्धार !

जुन्नर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चौथे त्रैवार्षिक जुन्नर तालुका अधिवेशन कॉम्रेड प्रभाकर संझगिरी भवन जुन्नर येथे पार पडले.

या अधिवेशनास डॉ. ज्ञानेश्वर मोटे, कॉ. प्रकाश जाधव यांनी संबोधित केले. पक्षाचे सचिव विश्वनाथ निगळे यांनी अहवाल मांडला.

यावेळी बेरोजगारी, महागाई विरोधीच लढा तीव्र करा. जातीय व धार्मिक सलोखा निर्माण होण्यासाठी प्रभावी मोहीम राबविणे, शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती करणे आणि शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी संघर्ष उभारणे, आदिवासी, दलित महिला यांच्या हक्कांसाठी लढा अधिक व्यापक आणि प्रभावी करणे, तालुक्यातील पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करणे, शिक्षणातील सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करणे हे सहा ठराव एकमताने पास करण्यात आले.

यानंतर १५ सदस्यांची नवीन तालुका समिती या अधिवेशनात निवडण्यात आली. या समितीला अधिवेशनाने एकमताने मान्यता दिली. तसेच पुढील तीन वर्षांसाठी माकप तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी उच्च शिक्षित युवा नेतृत्व कॉ. गणपत घोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

या वेळी पक्षाच्या कामकाजातील कमतरता आणि पक्षातील बलस्थाने आणि भविष्यातील आव्हाने यावर पक्षाचे जिल्हा समिती सदस्य आणि जुन्नर तालुक्याचे निरीक्षक कॉ. डॉ. महारुद्र डाके यांनी मार्गदर्शन केले. 

तसेच नवीन समितीला भविष्यात कामकाज करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी पक्षाचे पुणे जिल्हा सचिव एड. कॉ. नाथा शिंगाडे यांनी शुभेच्छा दिल्या.

या वेळी नवनियुक्त सचिव गणपत घोडे यांनी आगामी काळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करत त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आरोग्य आणि रोजगार विषयक समस्यांना प्राधान्य देऊन काम केले जाईल. तसेच तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पक्ष जिल्हा परिषद दोन गट आणि चार पंचायत समिती गण या जागा लढविणार असल्याची घोषणा केली.

या अधिवेशन प्रसंगी विलास डावखर, डॉ. मंगेश मांडवे, सरपंच मुकुंद घोडे, लक्ष्मण जोशी, संजय साबळे, सोमनाथ निर्मळ आदीसह मान्यवर सदस्य उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय