Monday, May 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडVideo : प्रचंड घोषणबाजीसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे गद्दार दिन साजरा

Video : प्रचंड घोषणबाजीसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे गद्दार दिन साजरा

पन्नास खोके, महाराष्ट्राला धोके, गुजरात ओके : अजित गव्हाणे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.२०
महाविकास आघाडी सरकारशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटांच्या खोके बहाद्दर विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे “गद्दार दिवस” साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे युवक अध्यक्ष इम्रान शेख,महिला अध्यक्ष कविता आल्हाट यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी युवकांच्या वतीने
“पन्नास खोके,एकदम ओके”
“पन्नास खोके महाराष्ट्राला धोके””पन्नास खोके युवकांना धोके”
“पन्नास खोके महागाई ओके”
“पन्नास खोके गुजरात ओके”
“खोके सरकार हाय हाय” अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना अजित गव्हाणे म्हणाले ” बेरोजगारी महागाई नवीन उद्योग महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न वाढती गुन्हेगारी या सर्व कसोटीवर हे खोके सरकार तोंडावर आपटले असून नागरिकांमध्ये या सरकार विषयी प्रचंड रोष आहे. आज या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर केल्यास निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार येईल असे ते म्हणाले. वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा अजेंडा हे सरकार राबवत असून सर्वसामान्य जनतेची कसलीही परवा न करता खोके सरकारचा तुघलकी कारभार जनता झेलत आहे.अशी जहरी टीका अजित गव्हाणे यांनी केली. यावेळी कविता अल्हाट म्हणाल्या “महाराष्ट्रातील पुरोगामी परंपरेला फाटा देत या सरकारची वाटचाल सुरू असून सातत्याने महिलांवर अत्याचार वाढत आहेत.महागाई आजवरच्या सर्वात उच्चांक गाठला आहे.महापुरुषांचा अपमान सातत्याने केला गेला आहे. जनता त्यांना धडा शिकवेल या भीतीने महापालिकेच्या निवडणुका मुद्दामून पुढे ढकलल्या जात आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला.



यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “जनतेने लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या महाविकास आघाडी सरकारशी गद्दारी करून हे मिंधे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात आराजकता निर्माण झाली असून सरकारचे अपयश लपवण्यासाठी विविध जाती- धर्मामध्ये तेढ निर्माण करणे, तरुणांना रोजगार न देता त्यांची माथी भडकवून त्यांना धर्मांधतेमध्ये अडकवणे. एखाद्या विशिष्ट समुदायाच्या विरोधात चित्रपट काढून समाजात फूट निर्माण करणे, या अजेंडावर हे सरकार काम करत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली हे या सरकारच अपयश आहे. महाराष्ट्रातील तरुणाची हक्काचे रोजगार गुजरातच्या घशात घालण्याचे महापाप या सरकारने केला आहे. काम एक रुपयाचं करायचं आणि शंभर रुपयाची जाहिरात करायची या सरकारचं पॅटर्न आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांना अटक करून लोकशाही संपुष्टात आणण्याचा षडयंत्र हे सरकार करत आहे या सर्व गोष्टींमुळे मिंधे सरकारच्या नाकर्तेपणाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध करतो.

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे , युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, मोहम्मद पानसरे, विजय लोखंडे, कार्याध्यक्ष निलेश निकाळजे, देवेंद्र तायडे, विकास कांबळे, ओम क्षीरसागर, मंगेश बजबळकर, सचिव मयूर थोरवे, मयूर खरात, मेघराज लोखंडे, अभिषेक जगताप, अजय पवार, पंकज भालेकर, विशाल काळभोर, कविता खराडे, सतीश चोरमेले तुकाराम बजबळकर, मंगेश बजबळकर, मिरा कदम, अर्जुन कदम, जावेद शेख,पंकज कांबळे, ज्योती गोफने, बाळासाहेब पिल्ललेवर, लता ओव्हाळ, मनीषा गटकळ, पल्लवी पांढरे, विजय दळवी, दत्तात्रय जगताप ,काशीनाथ जगताप, राजू खंडागळे, सचिन औटे, नितीन सूर्यवंशी, निर्मला माने, अनिल भोसले, नीलम कदम, माधव पाटील, विश्रांती पाडळे, संजय औसरमल, राजन नायर, रवींद्र सोनवणे, युवराज पवार ,महेश माने, के. डी. कांबळे, सोनाली नितनवरे, मुमताज इनामदार, सपना कदम, रिजवणा सय्यद , जया गवळी, वंदना जाधव यावेळी मोठ्या संख्येने युवक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये


Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका


ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय