Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC पाणीबाणी : पवना धरण पडू लागले कोरडे, फक्त "इतकाच" पाणीसाठा शिल्लक

PCMC पाणीबाणी : पवना धरण पडू लागले कोरडे, फक्त “इतकाच” पाणीसाठा शिल्लक

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : संपूर्ण महाराष्ट्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात फक्त 19 टक्के पाणी शिल्लक आहे. यावर्षी पावसाने ओढ दिली आहे.उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मावळ खोऱ्यात अद्यापही पाऊस नसल्याने धरण कोरडे पडत आहे.

पवना धरणात उपयुक्त पाणीसाठा 1.65 घनमीटर आहे. गेल्या वर्षी 19 जून रोजी 1.80 घनमीटर पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. मात्र, पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणी कपातीबाबतचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. असे पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी म्हटले आहे.


पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, जुलै अखेरपर्यंत अर्थात पुढील 40 दिवसांचा विचार केल्यास पवना धरणातील पाणी केवळ 19 दिवसच मिळेल, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये


Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका


ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय