Saturday, May 4, 2024
Homeआंतरराष्ट्रीयतुरुंगात महिला कैद्यांची तुंबळ हाणामारी; जाळपोळ अन् गोळीबारात ४१ जणींचा मृत्यू

तुरुंगात महिला कैद्यांची तुंबळ हाणामारी; जाळपोळ अन् गोळीबारात ४१ जणींचा मृत्यू

होंडुरास : महिला तुरुंगात झालेल्या दंगलीमुळे तब्बल ४१ कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. होंडुरास या देशामध्ये ही घटना घडली. या देशाच्या तुरुंग प्रशासनाच्या प्रमुख जुलिसा विलानुएवा यांनी याबाबत माहिती दिली. तुरुंगातील अधिकाऱ्यांकडून कैद्यांवर नियंत्रण आणले जात असताना वाद झाले होते. यावेळी या वादाची परिणीती दंग्यांमध्ये झाली.

मंगळवारी ही घटना घडली. यावेळी केवळ हाणामारीच नाही, तर जाळपोळ आणि गोळीबार देखील झाला. यामुळे ४१ महिला कैद्यांचा मृत्यू (Honduras Jail Riot) झाला, तर कित्येक कैदी जखमी झाल्या. मृतांपैकी अधिकांश कैद्यांचा मृत्यू जळाल्यामुळे झाल्याचं जुलिसा यांनी सांगितलं. तसेच, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. जुलिसा यांनी सांगितलं, की तुरुंगात काही गट अवैध सामान विकत होते. कैदी तुरुंगाच्या नियमांचं पालन करण्याऐवजी स्वतःचेच नियम बनवत होते. त्यामुळे त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी तुरुंग अधिकारी प्रयत्न करत होते. यावेळी याला विरोध होत असताना हे दंगे झाले.

होंडुरस देशात तुरुंगामध्ये दंगे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ साली याठिकाणी असलेल्या पुरुषांच्या तुरुंगामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत ४० कैद्यांचा मृत्यू झाला होत्या. महिलांच्या तुरुंगातही अशा घटना घडल्या आहेत. यापूर्वी MS-13 आणि 18th स्ट्रीट गँग्स या दोन गटांमध्ये असलेल्या वादातून कित्येक कैद्यांचा तुरुंगात खून झाला आहे. देशाच्या राष्ट्रपती शिओमारा कॅस्ट्रो यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं मत व्यक्त केलं. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या. “तुरुंगातील कैद्यांनी अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरच हे दंगे प्लॅन केले होते.” असं ट्विटही त्यांनी केलं.

हे ही वाचा :

राज्यातील ‘या’ सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट देणार

तुरुंगात महिला कैद्यांची तुंबळ हाणामारी; जाळपोळ अन् गोळीबारात ४१ जणींचा मृत्यू

PCMC पाणीबाणी : पवना धरण पडू लागले कोरडे, फक्त “इतकाच” पाणीसाठा शिल्लक

ढगांमध्ये कशी तयार होते प्राणघातक वीज, काय आहेत त्याची शास्त्रीय कारणे?

‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका

ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

मुबारक भाई पठाण ठरले महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम चोपदार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय