Thursday, July 18, 2024
Homeजिल्हास्वातंत्र्य सेनानी, शेतकरी नेते कॉम्रेड नानासाहेब पोकळे यांचे निधन !

स्वातंत्र्य सेनानी, शेतकरी नेते कॉम्रेड नानासाहेब पोकळे यांचे निधन !

बीड : कॉम्रेड नानासाहेब पोकळे यांचे 95 व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झाले. कॉम्रेड पोकळे हे थोर स्वातंत्र्यसेनानी होते. बीडचे माजी खासदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला आणि त्यानंतर शेतकऱ्यांची चळवळ उभारण्याच्या कार्याला लागले. त्याचबरोबर अखिल भारतीय किसान सभेचे अनेक वर्षे त्यांनी नेतृत्व केले. 

बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी चळवळ मजबूत करून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचे कार्य त्यांनी केले. कुकडी धरणाचे पाणी आष्टी तालुक्याला मिळावे ही मागणी पहिल्यांदा कॉम्रेड पोकळे यांनीच केली होती. आणि या मागणीला पुढे यश देखील मिळाले होते. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अनेक आंदोलने त्यांनी लढवली आणि यशस्वी केली.

 

“मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते शेवटपर्यंत एकनिष्ठ नेते राहिले. अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चळवळ उभारणीत बीड जिल्ह्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी त्यांच्या परिसरात एका उंचीला नेऊन ठेवले होते. त्यांच्या निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक अत्यंत चांगला मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या जाण्याने कम्युनिस्ट चळवळीत एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची उणीव कम्युनिस्ट चळवळीला कायम जाणवेल.” अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.

तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अशोक ढवळे म्हणाले, “कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे आणि कॉ. विठ्ठलराव नाईक या झुंजार स्वातंत्र्य सैनिकांच्या पिढीतील तितकाच झुंजार आणि सच्चा कम्युनिस्ट आणि किसान नेता आज आम्ही कॉ. नानासाहेब पोकळे यांच्या निधनाने गमावला आहे”.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय