Friday, May 10, 2024
Homeजुन्नरमाणिकडोह धरणातून जुन्नर शहराला बंदिस्त पाईपलाईन द्वारे होणार पाणीपुरवठा

माणिकडोह धरणातून जुन्नर शहराला बंदिस्त पाईपलाईन द्वारे होणार पाणीपुरवठा

पाणी पुरवठा योजनेला मिळाली अंतिम मंजुरी – नगराध्यक्ष शाम पांडे यांची माहिती 

जुन्नर / आनंद कांबळे : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांनी दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी सदर योजनेला अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सदरचा प्रकल्प हा जुन्नरची वाढती लोकसंख्या, उन्हाळ्यामध्ये शहराला जाणवणारी पाणी टंचाई, सद्यस्थितीतील नगरपालिकेची असलेली जुनी झालेली पाणी वितरण व्यवस्था इ. बाबींचा विचार करता जुन्नर शहराच्या उज्वल भविष्यासाठी हि योजना अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. सदर योजनेचा सर्वप्रथम ठराव हा दि. ५ एप्रिल २०१७ रोजी झाला असून त्यानंतर सदर कामाला सुरुवात झाली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सदर योजनेचे अंदाजपत्रक, आराखडे यांना मंजुरी दिली आहे. संपूर्ण योजनेचे सर्वेक्षण हे जुन्नर नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी संयुक्त केले आहे. सुमारे ९ किमी. लांबीची ४०० MM DIK 9 पाईपलाईन असे स्वरूप असून धरणाच्या मध्यवर्ती ठिकाणी जॅकवेल चे बांधकाम करून जुन्नर शहराच्या फिल्टरप्लांट पर्यंत बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी आणण्याचा मानस असून सदर योजनेचे तंत्रज्ञान हे अत्याधुनिक असून त्याठिकाणी विद्युत व्यवस्था, जनरेटर इत्यादी सर्व सुविधा असणार आहेत. सुमारे २.९१८ दश लक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण हे जुन्नर नगरपालिकेसाठी स्वतंत्र मंजूर आहे. सदरहू योजना मंजुरीसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विशेष प्रयत्न केले असून सातत्याने सदर कामाचा पाठपुरावा केला आहे. तसेच माजी आमदार शरददादा सोनावणे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पाठबंधारे विभागातील अधिकारी, नगरविकास विभाग मंत्रालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्व अधिकारी इ. सर्व यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले असून सर्व लोकप्रतिनिधी, जुन्नर शहरातील नागरिक यांच्या सहकार्याने सदर योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी जाहीर केले.

सदरची योजना हा एक ऐतिहासिक निर्णय व शहरची गरज लक्षात घेऊन अत्यंत उपयुक्त ठरणार असून लवकरच सदर कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले. तसेच सर्वांचे आभार मानले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय