Saturday, October 12, 2024
Homeराज्यभीक मागून पुरस्कार मिळतात, स्वातंत्र्य नाही ! कन्हैय्या कुमार

भीक मागून पुरस्कार मिळतात, स्वातंत्र्य नाही ! कन्हैय्या कुमार


मित्रांचं भलं करणारे सरकारचे धोरण

पुणे : भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’, स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य हे संघर्ष, त्याग आणि बलिदान केल्यानंतरच मिळते. अनेकांनी आपल्या आयुष्याचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवले आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य मिळत नाही. असं म्हणत वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर कन्हैय्याकुमार यांनी टीका केली आहे.

पुण्यात देशातील बदलती राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर शहरात वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

“मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे”, अशा शब्दात काँग्रेस नेता कन्हैया कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीनं कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

देशाच्या नावावर मित्रांचं भलं करण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत कधीड डिझेल 100 रुपये लिटर झालं नाही. महागाई आकाशाला पोहोचली आहे. गांधींजींची हत्या करणारे लोक आज देश विकायला निघाले आहेत. पंतप्रधान म्हणजे देश आहे का? पंतप्रधानांबद्दल काही बोललं की देशद्रोही ठरवलं जातं. जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार? असा खोचक सवालही कन्हैया कुमारने विचारलाय. 

सध्या व्हॉट्सअपवर देशाबद्दल काहीही बोललं जात आहे. यांना वाटतं कुणावरही यूएपीए लावू, बोलती बंद करु, पण साहेब हा भारत आहे, असंही कन्हैया कुमारने ठणकावून सांगितलं.


संबंधित लेख

लोकप्रिय