Sunday, April 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशाहूनगर येथे मोफत गरबा व रासदांडिया शिबीर संपन्न

शाहूनगर येथे मोफत गरबा व रासदांडिया शिबीर संपन्न

पिंपरी चिंचवड : नवरात्री उत्सव निमित्त पूर्णानगर, संभाजीनगर शाहूनगर, शिवतेज नगर परिसरातील महिलांसाठी एकता महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका पवार यांच्या वतीने महिलांसाठी मोफत गरबा व दांडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आठ दिवस चाललेल्या या प्रशिक्षणास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन सहभाग नोंदविला या प्रशिक्षणामध्ये महिलांना बॉलीवूड गरबाचे प्रशिक्षण देण्यात आले. या गरबा प्रशिक्षणाची सांगता बक्षिसे देऊन करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम व महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, युवक शहर उपाध्यक्ष योगेश मोरे, शहर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ जगताप, शहर उपाध्यक्ष सुनील कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पवार यांनी केले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय