Monday, May 13, 2024
Homeआंबेगावम्हाळुंगे तर्फे आंबेगाव येथे डोळे तपासणी व वाचनाचे चष्मे मोफत वाटप

म्हाळुंगे तर्फे आंबेगाव येथे डोळे तपासणी व वाचनाचे चष्मे मोफत वाटप

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्यविषयक सातत्यपूर्वक काम डॉ.शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र, किसान सभा, आदिम संस्था करत आहे. नुकतेच जतन फौंडेशन, आदिम संस्था, ग्लोबल व्हिजन फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव ता.आंबेगाव, जि.पुणे येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर व वाचनाचे मोफत चष्मे वाटप शिबीर पार पडले.

या शिबिरासाठी पुण्यातील नेत्ररोगतज्ञ, डॉ.बबन डोळस, डॉ.संजय कसबे व त्यांचे सहकारी डॉक्टर हे उपस्थित राहून त्यांनी रूग्णांची मोफत तपासणी केली. यावेळी उपस्थित रुग्णांना गरजेनुसार,

वाचनासाठी उपयुक्त ठरणारे, मोफत चष्मे वाटप केले. हे चष्मे जतन फौंडेशन यांनी उपलब्ध करून दिले होते.

यावेळी पन्नास पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांचेवर औषध उपचार करण्यात आले. व सुमारे चाळीस रूग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी दहा रूग्णांना, मोतीबिंदू असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी, ग्रामीण रूग्णालय, घोडेगाव येथे समनव्य करून ही ऑपरेशन होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी किसान सभेचे तालुका सचिव रामदास लोहकरे, जिल्हा समिती सदस्य कृष्णा वडेकर उपस्थित होते. या शिबिराचे स्थानिक संयोजन तुकाराम पारधी, अशोक जोशी, हिरा पारधी, रमेश पारधी, संदीप केवाळे, बाळू कोंढवळे यांनी केले होते.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय