Junnar : पिंपळगाव जोगा येथील चार वर्षीय बालिकेचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी सर्पदंशानंतर उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली गेली होती, परंतु डॉक्टरांनी उपचार न दिल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पिंपळगाव जोगा येथील सर्पदंश झालेल्या बालिकेला तिच्या पालकांनी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी 15 मिनिटे दवाखान्याचा दरवाजा उघडला नाही तसेच मुलीला हातसुद्धा लावला नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तिच्या पालकांनी “माझ्या मुलीला वाचवा” असे ओरडून सांगत होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना पुढील दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. (Junnar)
त्यानंतर, नारायणगाव येथे पोहोचायच्या आधीच, बालिकेने तडफडत आपला जीव गमावला. या घटनेमुळे संबंधित डॉक्टरांवर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. त्यांनी ओतूर आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांना कठोर शब्दात विचारणा केली. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाईची मागणी केली आणि कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेच्या केबिनला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
त्यानंतर सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी देवराम लांडे हे जिल्हा परिषदेत थेट जुन्नर वरून एक जिवंत साप व साप पकडणारा गारुडी घेऊन पोहोचले. तिथे त्यांनी संबंधित डॉक्टरला तात्काळ निलंबित करा नाहीतर तुमच्या केबिनमध्ये साप सोडतो असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिला. त्यानंतर काही वेळातच जिल्हा परिषद पुणे येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याचे आदेश काढले.
हेही वाचा :
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद
सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद
दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास