Sunday, December 8, 2024
Homeक्रीडाविश्वVinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खराब, सोशल मीडियावर...

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खराब, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Vinod Kambli : भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खराब असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचा चालतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते संतुलन साधण्यात अडचण येत असल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजी निर्माण झाली आहे.

विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून बिघडलेली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद कांबळीला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले जात आहे, तसेच नैराश्यानेही ते ग्रासलेले आहेत. व्हिडिओमध्ये कांबळी थोडे गोंधळलेले दिसत आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर काहींनी असा अंदाज वर्तवला की ते नशेत असावेत, तर इतरांनी त्यांची शारीरिक अस्वस्थता कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

Vinod Kambli

विनोद कांबळी यांनी भारतासाठी १०० हून अधिक वनडे आणि १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोच्च स्कोअर २६२ आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी जवळपास १०,००० धावा केल्या आहेत, ज्यामुळे ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान राखतात.

दरम्यान, दुसऱ्या एका बातमीत, रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ६६ धावांची दमदार खेळी करून वनडे क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. या कामगिरीमुळे रोहितने राहुल द्रविड यांना मागे टाकून देशातील चौथ्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचा मान मिळवला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

संबंधित लेख

लोकप्रिय