Friday, October 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयDonald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेनसिल्व्हेनियाच्या ग्रेटर पिट्सबर्ग भागातील बटरल काऊंटीमध्ये आयोजित रॅलीत हा प्रकार घडला. रॅलीदरम्यान एका व्यक्तीने गोळीबार केला, मात्र सुदैवाने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मंचावरून तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली आहे. डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या मते, गोळीबारात ट्रम्प यांच्या कानाला थोडी दुखापत झाली आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिसने त्यांना सुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे.

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांना त्वरित उपचारासाठी स्थानिक वैद्यकिय केंद्रात नेण्यात आले. गोळीबार करणाऱ्या शूटरला घटनास्थळीच गोळी लागली. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शूटर रॅलीच्या ठिकाणाच्या बाहेर एका इमारतीत लपला होता. या घटनेनंतर पोलिसांनी रॅलीचे मैदान तात्काळ रिकामे केले आणि गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शूटरची ओळख अद्याप पटलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रॅलीत आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.

या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रध्यक्ष जो बिडेन यांनी हा हत्येचा प्रयत्न होता की नाही हे सांगितले नसून, संपूर्ण माहिती येईपर्यंत वाट पाहणार असल्याचे म्हटले आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिसचे संपर्क प्रमुख अँथनी गुग्लिएल्मी यांनीही या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक

निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !

दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार

धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय