Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याfood poison : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

food poison : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

food poison : काही दिवसांपूर्वी भगर खाल्ल्याने 500 जणांना विषबाधा (food poison) झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली. महाशिवरात्री दिवशी शिंगाड्याचे पीठ खाल्ल्याने नागपुरातील अनेकांना विषबाधा झाली. या घटना ताज्या असतानाच धुळ्यात 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जवळपास 200 जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Police food poison)

नेमकं प्रकरण काय?

धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरूवारी संध्याकाळी जवानांना मेसमधून जेवण देण्यात आले. हे जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलीस जवान हजर झाले. मात्र, जवानांचा रोल कॉल सुरू होताच अनेक जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला.(Police food poison) त्यानंतर जास्त त्रास होत असल्याने जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी जवानांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचारानंतर जवानांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान जवानांना मेसच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. या विषबाधा प्रकरणाची पोलिस अधीक्षक धुळे यांनी देखील पुष्टी केली आहे. ज्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातीत 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली.

या सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहे.(Police food poison) या जवानांमधील सुमारे आठ जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर भामरे यांनी दिली आहे. दरम्यान जवानांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्याने धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय