Monday, May 6, 2024
Homeग्रामीणफेक न्यूज : क्रिकेट खेळताना मृत्यू झालेल्या बाबू नलावडे यांचा आणि "त्या"...

फेक न्यूज : क्रिकेट खेळताना मृत्यू झालेल्या बाबू नलावडे यांचा आणि “त्या” पोस्टचा काही संबंध नाही!

जुन्नर :  जुन्नर तालुक्यात जाधववाडी येथे काल (ता. १७) क्रिकेटचा सामना सुरू असताना ओझर संघाचा टेनिस क्रिकेटमधील बाबू नलावडे वय वर्ष 47 हे नॉन स्ट्राईकवर खेळत असताना अचानक मैदानावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर एक अफवा झपाट्याने पसरली.

काय आहे अफवा?

काल क्रिकेट सामना सुरू असताना बाबू नलावडे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या प्रेमिकेने आत्महत्या केल्याच्या पोस्ट शेअर करण्यात येत आहेत. दाव्यात म्हटले आहे की, “आपला प्रियकर क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मरण पावला हे समजल्यावर स्वतःचा जीव देणारी एक खरी प्रेमिका या जगात अजूनही मिळू शकते” अशा आशयाचा व्हिडिओ आणि फोटो व्हाट्सएपवर काही वेळातच प्रचंड शेअर झाले. मात्र या घटनेचा बाबू नलावडे यांच्याशी काही संबंध नाही.

तो फोटो बाबू नलावडे यांचा नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट मधील फोटो बाबू नलावडे यांचा म्हणून शेअर करण्यात येत आहे मात्र तो फोटो त्यांचा नाही. 

त्या फोटोतील ते दोघे कोण?

त्या फोटोतील त्या मुलाचे नाव अनिकेत पाटील (वय 19) आणि मुलीचे नाव सानिका व्हनाळकर आहे. ते कोल्हापूर, करवीर तालुक्यातील चुये गावातील असून अनिकेत आणि सानिका या दोघांनी (ता. 16) रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

अनिकेत आणि सानिकाने विष प्राशन केल्यानंतर दोघांनाही उपचारासाठी कोल्हापूर शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अशी चर्चा आहे, मात्र तरुणीने घरच्यांवर लग्नाचे कर्ज होऊ नये म्हणून आत्महत्या केली असल्याची चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण काय याचा तपास पोलिस करत आहेत.

बाबू नलावडे आणि त्यांचा परिवार

बाबू नलावडे हे “टाइम्स ऑफ इंडिया” या वृत्तपत्रात डिझायनर म्हणून कार्यरत होते. वर्क फ्रॉम होम असल्याने ते सध्या घरून काम करत होते. त्यांना क्रिकेटची आवड असल्याने त्या दिवशी ते क्रिकेट खेळण्यासाठी गेले असताना ही दुःखद घटना घडली. बाबू नलावडे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आणि आई वडील असा परिवार आहे. तर मुलीचे नाव अनन्या असल्याची माहिती त्यांचे मेव्हणे संतोष बेनके यांनी “महाराष्ट्र जनभूमी”शी बोलताना दिली.

या दोन्हीही घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. अनिकेत आणि सानिका यांचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील चुये हे आहे तर बाबू नलावडे यांचे गाव जुन्नर तालुक्यातील जाधववाडी आहे. 

जुन्नर : क्रिकेटच्या भर मैदानात नॉन स्ट्राईकवर उभ्या असणाऱ्या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सोशल मीडियावर केलेला तो दावा फेक आहे. कोणतीही गोष्ट शेअर करताना त्याची सत्यता तपासून पाहिल्या शिवाय शेअर करू नये.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय