Sunday, May 19, 2024
Homeराज्यसातारा : ...अखेर 'त्या' मुख्याध्यापिकेच्या भ्रष्टाचाराची - आर्थिक गैर व्यवहाराची चौकशी होणार...

सातारा : …अखेर ‘त्या’ मुख्याध्यापिकेच्या भ्रष्टाचाराची – आर्थिक गैर व्यवहाराची चौकशी होणार !

संयुक्त चौकशी समिती गठित, 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे शिक्षणाधिकारी सातारा यांचे गटशिक्षणाधिकारी यांना आदेश

सातारा : के.बी.एन.हिरवे विद्यालय शेवरी तालुका माण या शाळेतील शिक्षक भास्कर लहू बागूल यांच्या वेतन तसेच मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना रामचंद्र पाटील यांच्या आर्थिक गैर व्यवहाराबाबत संयुक्त चौकशी समिती  नेमून चौकशी करून 7 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र खंदारे यांनी श्रीमती सोनाली विभुते गटशिक्षणाधिकारी माण व  श्रीमती मनिषा चंदुरे शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांना दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये दिले आहेत. 

आदेशात म्हटले आहे की, संदर्भ क्रमांक 1 अनुसार सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी सौ.अर्चना रामचंद्र पाटील मुख्याध्यापिका, के.बी.हिरवे विद्यालय शेवरी तालुका माण जिल्हा सातारा यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करा,अशा मागणीचे निवेदन ऑडीओ  पुराव्यानिशी दिले होते, ते कार्यालयास प्राप्त झाले आहे. 

          

निवेदनात नमूद आहे की, भास्कर लहू बागूल,शिक्षक के.बी.एन.हिरवे विद्यालय शेवरी तालुका माण यांचा पगार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना रामचंद्र पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा माणला पञ देऊन  नोव्हेंबर 2019 पासून  जानेवारी 2021 पर्यंत  जाणीवपूर्वक अडवून आर्थिक कोंडी करून पिळवणूक केली आहे. 

त्या तक्रारीची शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांनी 22 जानेवारी 2020 रोजी सखोल चौकशी चौकशी केली आहे. माञ पुढील कार्यवाही केलेली दिसत नाही. त्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने सुडबुद्धीने मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पाटील ह्या भास्कर बागूल शिक्षकास शाळेत हजर करून घेत नाहीत, हजेरीपञकावर सही करू देत नाहीत व जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

मुख्याध्यापक के.बी.एन.हिरवे विद्यालय शेवरी तालुका माण यांना 22 जानेवारी रोजी  सक्षम खुलासा सादर करण्यास कळविले होते, माञ याबाबत मुख्याध्यापकांनी अद्याप खुलासा सादर केलेला नाही. तरी याबाबत के. बी.एन.हिरवे विद्यालय शेवरी तालुका माण शाळेची संयुक्तिक रित्या सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल 7 दिवसांत या कार्यालयात सादर करावा,असा आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांनी गटशिक्षणाधिकारी माण व शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांना 8 फेब्रुवारी रोजी दिला आहे. चौकशी अहवालावरून मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना रामचंद्र पाटील (हिरवे) यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्व शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय