Sunday, May 19, 2024
Homeराज्यनागपूर : संयक्त किसान मोर्चाच्या रेल रोकोला समर्थन देत रामटेक येथे निदर्शने

नागपूर : संयक्त किसान मोर्चाच्या रेल रोकोला समर्थन देत रामटेक येथे निदर्शने

रामटेक (नागपूर) : अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज 18 फेब्रुवारी रोजी रामटेक तहसील समोर संयुक्त किसान मोर्चाच्या रेल रोको ला समर्थन म्हणून निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार बाळासाहेब मस्के याना निवेदन देण्यात आले. 

यात नवीन शेतकरी कायदे रद्द करा, MSP वर कायदा बनवा, पेट्रोल-डिझेल व गॅस ची भाव वाढ कमी करा, वाढत्या महागाईवर नियंत्रण आणा आदी मागण्याचा समावेश आहे. 

आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे सचिव कॉ. राजू हटवार, भीमराव गोंडाने, नत्थुजी परतेती, डॉ. ओमप्रकाश आष्ट्णकर, हरिदास चिंटोले, वेनुदास भीमटे, कैलास रहाटे, तुळशीराम कोठेकर, प्रदीप वानखेडे, बन्सीलाल कोकुडे, राजकुमार अडकणे, प्रभू आष्ट्णकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय