Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणबाऱ्हे, पळसण, पांगारणे, माणी याठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरू करा - सभापती...

बाऱ्हे, पळसण, पांगारणे, माणी याठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरू करा – सभापती महाले

सुरगाणा :  सुरगाणा तालुक्यातील बा-हे विभाग तसेच पळसन या भागामध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नसल्यामुळे या परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, वृद्ध, अपंग, नोकरदार वर्गांना आर्थिक व्यवहार करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांना बँक सुविधा घेण्यासाठी वीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करून शेजारच्या गावामध्ये जावे लागते तसेच वाहतुकीची साधने देखील खूपच कमी आहेत. त्यामुळे बँक सेवा घेणे खूप कठीण होत आहे तसेच आणि जर नागरिक बँक मध्ये आलेच तर  तर त्यांना पैसे काढण्यासाठी पूर्ण दिवस रांगेत उभे राहावे लागते. त्यासाठी बाऱ्हे, पळसण, पांगारणे, माणी या सर्व ठिकाणी लवकरात लवकर बँक शाखा सुरू कराव्यात असे पञ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुरगाणा पंचायत समिती सभापती मनिषा योगीराज महाले यांनी दिले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय