Thursday, September 19, 2024
Homeजिल्हामानसिक ताण दूर होण्यास व्यायामाची मदत होते - डॉ. दीपक शहा

मानसिक ताण दूर होण्यास व्यायामाची मदत होते – डॉ. दीपक शहा

चिंचवड : चिंचवडमधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसाठी उत्तम दर्जाची सर्व साधने संस्थेने उपलब्ध करून प्रशस्त व्यायाम शाळेचे उद्घाटन सोहळा संस्थेच्या 14 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. पांडुरंग इंगळे, प्रा. शबाना शेख, संदीप शहा यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. तर, डॉ. दीपक शहा यांच्याहस्ते मारुतीच्या प्रतिमेसमोर श्रीफळ वाढवण्यात आले. त्यावेळी कमला शिक्षण संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्रचार्या डॉ. क्षितिजा गांधी, पी.आय.बी.एम.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, क्रिडा शिक्षक दर्शन गंधे उपस्थित होते. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक विभागाचे सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे यांच्या व आदींच्या प्रोत्साहनाने आणि शारीरिक विभागाच्या विशेष पुढाकाराने संस्थेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍याच्या निरोगी आरोग्यासाठी मोफत सुरू करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. महाविद्यालये बंद होती, अनेकांना मानसिक त्रास, नैराश्य, चिडचिडेपणा, वजन वाढणे आदी समस्यांना सामोरे जावे लागले. प्रत्येकांचे आरोग्य हीच खरी संपत्ती असून नियमित व्यायाम केल्यामुळे मानसिक ताण दूर होतो. शरीर स्वस्थ आणि तंदुरूस्त असेल तर, सुखी जीवन जगता येते.

आता महाविद्यालये सुरू झाले असून विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास, कोरोनाची भिती तसेच त्यांच्या पालकांना पाल्याविषयी वाटणारी चिंता दूर व्हावी, प्रत्येकांचेच निरोगी आरोग्य रहावे, यासाठी प्रशस्त व्यायामशाळा सुरू करण्यात येत आहे. सदर व्यायाम शाळेसाठी शारिरीक शिक्षण विभागाचे प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले म्हणून आज त्यांच्याच हस्तेच उद्घाटन करण्यात येत आहे. संस्था ही एक परिवार आहे. येथे उत्तम व आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन संस्थेच्या 14 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शारिरीक विभाग प्रमुख प्रा. शबाना शेख यांनी केले.


संबंधित लेख

लोकप्रिय