Women wrestler : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी इंडिया कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजपाचे नेते, माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बृजभूषण सिंह यांना दिल्ली न्यायालयाने पुन्हा झटका दिला आहे. (women wrestler)
लैंगिक छळ प्रकरणाची पुढील चौकशी करण्याची, प्रशिक्षकाच्या ‘पह्न कॉल’ची माहिती सादर करण्याची मागणी करणारी बृजभूषण यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली न्यायालयातील न्यायाधीश प्रियंका राजपूत यांनी याप्रकरणी बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी 7 मे ही तारीख निश्चित केली आहे. दरम्यान, बृजभूषण सिंह यांनी आरोपांवरील युक्तिवाद आणि पुढील तपासासाठी वेळ मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुस्ती महासंघाच्या कार्यालयात छळ झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे, मात्र त्या दिवशी मी हिंदुस्थानात नव्हतो, असा दावा बृजभूषण यांनी केला आहे.
बृजभूषण यांच्या वकिलाने दावा केला की, दिल्ली पोलिसांनी तक्रारदारासोबत असलेल्या प्रशिक्षकाच्या कॉल डिटेल रेकॉर्डवर विश्वास ठेवला होता आणि ते 7 सप्टेंबर 2022 रोजी कुस्ती महासंघाच्या कार्यालयात गेले असल्याचे सांगितले होते. तिथेच विनयभंग करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांनी सीडीआर रेकॉर्डवर ठेवलेला नाही, असा दावा वकिलाने केला. दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी बृजभूषण यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!
नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई
मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी
बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!
ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर