Sunday, April 28, 2024
Homeजुन्नरजुन्नर येथे अंबिका श्रामनेर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

जुन्नर येथे अंबिका श्रामनेर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

जुन्नर / आनंद कांबळे : महाराष्ट्रात सर्वात जास्त बौद्ध लेण्या असणाऱ्या जुन्नर तालुक्यात श्रामनेर शिबिर नुकतेच संपन्न झाले.

भगवान बुद्धांच्या अडीच हजार वर्षानंतर जुन्नर तालुक्यातील लेण्यांवर जाऊन श्रामणेर शिबिराचे आयोजन प्रथमता जुन्नर तालुक्यात झाले. इतिहासात ठरणारी नोंद आहे. हे शिबिर पाच दिवस चालू होते. लेण्याद्री लेणी, मानमोडी लेणी, आंबा अंबिका लेणी अशा अनेक लेण्यांवर जाऊन हे शिबिर घेण्यात आले‌. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रामधून 150 भिकू संघ आणि उपासक असे सहाशे लोक उपस्थित होते. हे सगळे शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश भावळ, प्रज्वल भालेराव, उमेश वाघमारे, अनिरुद्ध ठोसर, गणेश सोनवणे, मंगेश वाघमारे, सतीश वाबळ, निहाल भालेराव, शंकर रोकडे, अक्षय लवांडे, पियुष खरात, पंकज खरात, ऋषिकेश खरात यांनी विशेष परिश्रम घेतले. तर भिकू संघाची पाच दिवसाची निवासाची व्यवस्था जुन्नरच्या माजी उपनगराध्यक्ष अलकाताई फुलपगार यांनी केली.

Lic
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय