Wednesday, May 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रबोधनाची वाट न्यारी... कामगारांनी काढली सायकल रॅली !

प्रबोधनाची वाट न्यारी… कामगारांनी काढली सायकल रॅली !

पर्यावरणाचा संदेश देत 120 किलोमीटरची बारामती – पंढरपूर सायकल रॅली

बारामती ( क्रांतीवीर रत्नदीप ) :
बारामती एमआयडीसी येथील आयएसएमटी (किर्लोस्कर) कंपनीतील कामगार बंधूंनी 20 ऑगस्ट रोजी बारामती ते पंढरपूर सायकल रॅली काढली. हे 120 किलोमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या सात तासांमध्ये पार केले. विशेष म्हणजे यातील सर्व कामगारांचे वय हे 50 च्या पुढे आहे. पहाटे पाच वाजता भिगवन चौकातील सिद्धिविनायक मंदिरात हे सर्व एकत्र जमले आणि येथून प्रवासाची सुरुवात झाली. दर 20 किलोमीटरवर पाच मिनिटांचा छोटा थांबा घेत पर्यावरणाचे प्रबोधन करत ही रॅली पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली.



प्रत्येक माणसाने दिवसातील ठराविक वेळ सायकल चालवण्यासाठी दिला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी सायकल ही गुरुकिल्ली आहे. वयाच्या पन्नाशीनंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. वेगवेगळे मानसिक ताण तणाव कौटुंबिक कलह चिडचिडेपणा वाढायला सुरुवात होते. कार, दुचाकीच्या वापरामुळे हवा प्रदूषण वाढले आहे. याबद्दल जनजागृती निर्माण करणे हा एकमेव उद्देश या सायकल रॅलीचा होता.



दररोज सायकल चालवल्याने शारीरिक आरोग्य तर सुधारतेच शिवाय मन प्रसन्न होते. त्यासाठी सायकल चालवणे गरजेचे आहे हे ओळखून याबाबत जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने कंपनीतील कामगारांनी मिळून बारामती ते पंढरपूर सायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये प्रामुख्याने उदय खलाटे, संपत देवकाते, कल्याण कदम, बाळासो रणवरे, राजेंद्र टेंगले, शहाजी बाबर, हनुमंत ठोंबरे, संजय कालेल, महादेव मासाळ, तानाजी लांडगे, सोपान जरांडे, राजेंद्र चौधरी इत्यादी कामगार बंधूंनी सहभाग घेतला. या रॅलीला मार्गदर्शन नितीन थोरवे, निलेश घोडके यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय