सुरगाणा : आधार कार्ड कंद्र तात्काळ सुरू करा, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागातील जनतेला आधार कार्ड काढण्यासाठी थेट वणी येथे जावे लागते. ग्रामीण भाग आणि लोकडाऊन च्या काळात जाण्यासाठी कुठलीच सोय नसल्याने बरेच दिवस त्या कामासाठी जात आहेत. आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध नसली तर परत घरी यावे लागते, त्यात पैसा आणि वेळ वाया जातो. त्यामुळे सुरगाणा तालुक्यातील बाजारच्या ठिकाणी आधार कार्ड केंद्र सुरू करावे अशी मागणी DYFI संघटनेने केली आहे.
उंबरठाण, बारे,पंगारने, पळसन,सुरगाणा, बोरगाव, मनखेड वरील ठिकाणी तात्काळ आधार कार्ड केंद्र सुरू करावे अन्यथा DYFI वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी DYFI चे राज्य उपाध्यक्ष इंद्रजित गावित, पांडुरंग गायकवाड, अशोक धूम, नितीन पवार, परशराम गावित, तुळशीराम खोटरे, राहुल गावित, नितीन गावित, योगेश जाधव उपस्थित होते.