Tuesday, May 21, 2024
Homeजिल्हाPurna : पूर्णेतील समस्यांना घेऊन डीवायएफआय ची पायी रॅली!

Purna : पूर्णेतील समस्यांना घेऊन डीवायएफआय ची पायी रॅली!

पूर्णा : आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेकडून पूर्णा शहरातील महात्मा फुले नगर, डॉ.आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर येथील विविध समस्यांना घेऊन पायी रॅली काढत आंदोलन करण्यात आले. DYFI’s foot rally with problems in Purna

आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे

1. डॉ. आंबेडकर नगर येथील कमानीपासून अमोल नगर कॉर्नर पर्यंत पक्का रस्ता बांधा.

2. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भूमिगत विद्युत खांब बसवा.

3. रेल्वे भिंती लगतचा रस्ता पक्का बांधणे व विद्युत खांब बसवा.

4. डॉ. आंबेडकर नगर येथील कमानीजवळील कचऱ्याची विल्हेवाट लावा. तसेच तिन्ही नगर मधील कचऱ्याची विल्हेवाट लावा.

5. पक्क्या नाल्या बांधणे व त्यांची नियमित सफाई करा.

6. रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ खऱ्या गरजूंनाच द्या.

7. गायरानाचे कारण न देता मालकी हक्क प्रमाणपत्रा विना दोन्ही घरकुल योजनेचा लाभ तिन्ही नगरातील गरजूंना द्या.

8. घंटागाड्या पूर्ववत सुरु करा.

या पायी रॅलीत डीवायएफआय संघटनेचे जिल्हा सचिव नसीर शेख, जिल्हा व तालुका कोषाध्यक्ष जय एंगडे, तालुका सहसचिव अजय खंदारे, प्रबुद्ध काळे आकाश भगत, याशिवाय समता सैनिक दलाचे प्रमुख पदाधिकारी सुनील मगरे आणि संदेश खाडे,  नागरिकांतून भूषण भुजबळ, वामन खर्गखराटे, किशोर आढाव, विशाल खंदारे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय