नांदेड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची यादी लवकरात लवकर जाहीर करा आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्या, या मागणीसाठी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने समाज कल्याण आयुक्त नांदेड यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसूचित जाती घटकातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वरदान ठरत आहे, ते या योजनेमुळे आपलं शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करू शकत आहेत. कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्राला हानी पोहचली होती पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि सर्व सुरळीत सुरू आहे. महानगरात शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांची हेळसांड लक्षात घेऊन लवकरात लवकर स्वाधार योजनेची यादी जाहीर करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर डीवायएफआयचे राज्यसहसचिव तथा परभणी जिल्हासचिव नसीर शेख, स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाचे नांदेड जिल्हा सचिव विशाल भद्रे, अमोल पट्टेकर, महेंद्र पंडित, नागेश गायकवाड, अजय मोरे, दिनेश पंडित, सचिन जोगदंड, संकेत पंडित, हर्षदीप राजभोज, पवन जगमडवार, चंचल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.