Friday, April 26, 2024
Homeबॉलिवूड... आता अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र ! 

… आता अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र ! 

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhaskar) धमकीचं पत्र आलं आहे. याबाबत स्वराने ट्विटरवर माहिती दिली आहे. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता सलमान (Salman Khan) ला धमकी देण्यात आली होती.

अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी हे पत्र मिळालं आहे. अभिनेत्रीने त्वरित पोलिसांमध्ये धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात दखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.

या पत्रात लिहिण्यात आलं आहे, ‘देशातील युवक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाहीत.. आपण फक्त आपल्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावं.असं म्हणत या पत्रात आणखी काही अपमानास्पद मजकूर लिहण्यात आला आहे. पत्राच्या शेवटी देशाचा युवक अशी स्वाक्षरी करण्यात आली आहे. 

स्वरा भास्कर ही प्रखरपणे मत मांडत नेहमी चर्चेत असते. आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या वक्तव्यावर आणि सरकारच्या धोरणांवर अभिनेत्री स्वरा भास्कर टिका करत असते. स्वरा भास्करने 2017 मध्ये सावरकरांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यांनतर सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला होता. स्वरा च्या या टिका टिप्पणी मुळेच हे पत्र आल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय