Pune / राजेंद्रकुमार शेळके : पत्रकार, समाजसेवक डॉ.मुनीर तांबोळी यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. त्यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद बागल, प्रदेश युवक सरचिटणीस प्रा. नारायण खरजे, युवक जिल्हा अध्यक्ष शहबाज पटेल, माजी महिला जिल्हाध्यक्ष नेहा पाटील उपस्थित होते. विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कळंबोली येथे पक्ष प्रवेश झाला. Pune
त्यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले की डॉ.मुनीर तांबोळी हे एक धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. येणाऱ्या काळात पक्ष संघटना मजबूत करणे, पक्ष बांधणी करणे यावर भर दिला जाणार आहे. अनेक तरुणांनी आज प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात अनेक प्रवेश होतील असा विश्वास युवक जिल्हा अध्यक्ष शहबाज पटेल यांनी व्यक्त केला.
तांबोळी यांनी बोलताना सांगितले की, आम्हाला काम करण्याची संधी दिलीत त्यांचे नक्कीच आम्ही सोने करू, येत्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्व सहकारी मेहनत घेतील. त्यावेळी डॉ.श्रेयस ठाकूर म्हणाले की, सतीश पाटील यांची काम करण्याची पद्धत त्यांचा स्वभाव, अभ्यास यामुळे चांगले मार्गदर्शन लाभेल याची खात्री आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षात डॉ.मुनीर तांबोळी, डॉ.श्रेयस ठाकूर, पंकज शाह, हितेंद्र निकम, इरफान तांबोळी, संदीप घाडगे, आमिर पठाण, प्रवीण निंबाळकर, अभिषेक लाड, मोहम्मद सद्दाम, बिलाल बालगिर, प्रशांत सिंग, रफिक फरीद, ऋषिकेश, झिशन सिद्दिकी ओमकार भोपी, हर्ष जागे, साबीर नदीम, फिरोज सय्यद आदींनी प्रवेश केला. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष पदी विकास पारचे तर नवीन पनवेल युवक कार्याध्यक्ष पदी मो.सद्दाम हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली.
हे ही वाचा :
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…
ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला
मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष