Monday, May 6, 2024
Homeजुन्नरJunnar: एका गोष्टीवरून जुने मित्र भिडले ! दिला थेट इशारा

Junnar: एका गोष्टीवरून जुने मित्र भिडले ! दिला थेट इशारा

Shirur Loksabha Election 2024 : देशात आणि राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू असून एकमेकांवर टीकास्त्र सुरू आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे जुने मित्र एकमेकांवर चांगलेच भिडले‌त. Junnar News

अतुल बेनके यांनी अमोल कोल्हे यांना लक्ष्य करत निशाणा साधला, ते म्हणाले, “नव्या दमाचा खासदार म्हणून अमोल कोल्हेंना निवडुन आणलं. मात्र, निवडणुकीनंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाचा भ्रमनिराश केला. अमोल कोल्हे तुम्ही ज्या गावांमध्ये जाऊन भाषणं करता. तिकडे तुम्ही आजपर्यंत पाठ फिरविलीय. नुसत्या गप्पा हाणायच्या. तुमच्या गप्पांना जनता भुलणार नाही, अशा शब्दांत अतुल बेनकेंनी अमोल कोल्हेंवर निशाना साधला.” यावर कोल्हेंनी सुध्दा अतुल बेनके यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

कोल्हेंनी पटलवार करत अतुल बेनके यांना थेट इशाराच दिला आहे. कोल्हे म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणं, राजकिय पार्श्वभूमी नसताना शेतकऱ्याचं पोरगं खासदार झालं म्हणुन पश्चाताप झाला की? ज्यांच्यामुळे तुमची लॉटरी लागली त्याचा तुम्हाला पश्चताप झाला? असे अनेक सवाल उपस्थित करत अतुल बेनके यांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. Junnar News

कोल्हे पुढे म्हणाले, “तुम्ही शरद पवारांना दगा फटका दिला, म्हणून जुन्नरच्या जनतेला पश्चताप झालाय. पुढे अजून विधानसभेची निवडणूक आहे. मी या निवडणुकीतुन मोकळा झालो की “करारा जवाब मिलेगा”, असा थेट इशाराच कोल्हेंनी अतुल बेनके यांना दिलाय.

शिरूर लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत

शिरूर लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालं असून या ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीचे खासदार अमोल कोल्हे आणि महायुतीचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय