Wednesday, May 8, 2024
Homeआंबेगावहिरडा नुकसानभरपाई चा निर्णय मंत्रिमंडळात त्वरित व्हावा यासाठी तळेघर येथे धरणे आंदोलन

हिरडा नुकसानभरपाई चा निर्णय मंत्रिमंडळात त्वरित व्हावा यासाठी तळेघर येथे धरणे आंदोलन

घोडेगाव : हिरड्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून येत्या 15 फेब्रुवारी पासून, मंचर प्रांत कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषणात डॉ. अमोल वाघमारे, भीमाबाई लोहकरे, कमलताई बांबळे, रोशन पेकारी, नारायण वायाळ इ. सहभागी झाले आहे. Dharna movement at Taleghar

या उपोषणाची दखल घेत, काल शिवजयंती महोत्सव, जुन्नर येथे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हिरडा नुकसान भरपाई देणेविषयी मान्य केले आहे. परंतु मंत्रीमंडळात निर्णय झाल्याशिवाय हे उपोषण स्थगित केले जाणार नाही. असे आंदोलक डॉ.अमोल वाघमारे यांनी घोषित केले आहे.

मंत्रीमंडळाची लवकर बैठक व्हावी व या बैठकीत हा विषय मार्गी लागावा म्हणून आज तळेघर येथे शेकडो हिरडा उत्पादक शेतकरी यांनी एकत्रित येत जोरदार निदर्शने केली.

यावेळी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नाथा शिंगाडे, जिल्हा परिषद चे माजी सदस्य विजय आढारी, तिरपाडचे सरपंच सोमा दाते, राजपूर सरपंच चंद्रकांत लोहकरे, चिखलीचे सरपंच जयराम जोशी, कोंढवळ चे सरपंच दिपक चिमटे, तळेघरच्या सरपंच कविता इष्टे, शांताराम लोहकरे चेअरमन पतसंस्था तळेघर, का. बा. लोहकरे, भाऊ वायाळ उपसरपंच, किसन लोहकरे उपसरपंच, सोमनाथ गेंगजे उपसरपंच गोहे, आदिवासी सोसायटीचे संचालक अशोक जोशी, फलोदे गावचे सरपंच नामदेव मेमाणे, विकास भाईक, गोविंद चिमटे, मच्छिंद्र वाघमारे, सखाराम आढारी, शामराव बांबळे तसेच किसान सभेचे आंबेगाव तालुका सचिव रामदास लोहकरे, माजी अध्यक्ष कृष्णा वडेकर, अशोक जोशी, दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे इ. उपस्थित होते. व उपस्थित सर्वांनी या लढ्यात आम्ही सहभागी आहोत हे घोषित केले..

यावेळी “राज्य शासनाने मंत्रिमंडळात हिरडा नुकसानभरपाई चा निर्णय त्वरित घ्यावा अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल..” असा इशारा किसान सभेचे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी यांनी दिला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय