Friday, May 17, 2024
HomeNewsPCMC:पिंपरी ते पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या पुलाचे काम लवकरच पुर्ण होणार

PCMC:पिंपरी ते पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या पुलाचे काम लवकरच पुर्ण होणार

माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा पाठपुरावा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:पिंपळे सौदागर कडुन पिंपरीकडे जाताना जुन्या पुला लगत नविन समांतर पुल बांधण्याचे काम चालु असुन लवकरच त्याचे काम पुर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

या पुलाचे काम करत असताना दत्त मंदिर समोरील रस्त्याचे डांबरीकरण करताना गावठाणातील पाणी व लोंढे वस्ती आणि परिसरातील पाणी लोंढे वस्ती येथे येते. त्या पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.त्यामुळे स्टॉर्म वॉटर लाईन,ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन इत्यादीचा योग्य  प्रमाणात निचरा होईल याची प्रामुख्याने काळजी घेण्याचा सुचना मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संबंधित महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या व या कामामध्ये पुलाचा बाजुने जे लोखंडी रेलिंग केले जाणार आहे त्याचे नमुना म्हणुन काही रेलिंग बसवले आहेत.ते देखील सुरक्षेचा दृष्ठीने चागल्या दर्जाचे असावे तसेच गावठाणातून पुलाकडे येताना डांबरीकरणाचा उतार योग्य प्रमाणात करण्यात यावा.जेणेकरून नागरिकांना वाहने चालवताना त्रास होणार नाही अशा सुचना देखील संबधित अधिकारी याना केल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय