Friday, November 22, 2024
Homeजिल्हाआरक्षणाची घटनात्मक चौकट मोडून धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करू नये –...

आरक्षणाची घटनात्मक चौकट मोडून धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करू नये – एसएफआय 

मावळ : आरक्षणाची घटनात्मक चौकट मोडून धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करू नये, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने वडगाव मावळ च्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. Dhangar community should not be included in Scheduled Tribe by breaking the constitutional framework of reservation – SFI

आरक्षणाची घटनात्मक चौकट मोडून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (TISS) संस्थेने धनगर समाजाच्या संदर्भातील संशोधन अहवाल राज्य सरकारने जाहीर करावा. आदिवासी समाजाच्या योजनांचा लाभ धनगर समाजाला देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मागे घ्यावा व धनगर समाजासाठी स्वतंत्र योजना राबवाव्यात. आदिवासी विशेष सरकारी नोकर भरती तात्काळ सुरू करावी, आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

वडगाव मावळ च्या तहसीलदारांना निवेदन देतेवेळी एसएफआय चे पुणे जिल्हा सदस्य राजू शेळके, पुणे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, किसन लोहकरे, गणपत वळवी, विशाल आढारी, संतोष मोरमारे, सुनील चिमटे, ओमकार मोरमारे हे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय