भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ ‘दाना’ गुरुवारी रात्री साडेबारा वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. केंद्रपारा जिल्ह्यातील भितरकनिका आणि भद्रक जिल्ह्यातील धामरा दरम्यान ते सुमारे 120 किमी प्रतितास वेगाने पोहोचले. (Dana cyclone)
दाना चक्रीवादळाच्या वेगामुळे ओडिशातील अनेक शहरात आणि ग्रामीण भागात झाडे उन्मळून पडली आहेत. रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग तुटले आहेत. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, किनारपट्टीच्या भागात आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दाना चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी NDRF आणि इंडियन कोस्ट गार्ड यांनी सर्व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या.
या वादळा मुळे अनेक ठिकाणी भुसखलन झाले, विशेषत: शेतीचे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी जाहिरातीची hoardings कोसळले. भुवनेश्वर विमानतळावरील विमान उड्डाणे काही काळ स्थगित ठेवण्यात आली होती. दाना चक्रीवादळाचा भातशेतीवरही परिणाम झाला, कारण विस्तीर्ण भातशेती सपाट झाली आणि पिके पाण्याखाली गेली. पश्चिम मेदिनीपूर आणि इतर प्रभावित भागातील शेतकऱ्यांनी अलीकडील पुरामुळे झालेल्या अतिरिक्त नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली. (Dana cyclone)
दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारच्या तयारीची माहिती घेतली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण ५,८४,८८८ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Dana cyclone)
सध्या दाना चक्रीवादळाचा वेग मंदावला असून ओरिसा आणि बांगला मध्ये पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ ‘दाना’ गुरुवारी रात्री साडेबारा वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. केंद्रपारा जिल्ह्यातील भितरकनिका आणि भद्रक जिल्ह्यातील धामरा दरम्यान ते सुमारे 120 किमी प्रतितास वेगाने पोहोचले.
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित