Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Majhi ladki bahin yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या महत्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिकाकर्त्यांनी या योजनेला भ्रष्ट आणि मतदारांना आमिष दाखवण्याचे मानले होते.

याचिकेत 14 ऑगस्ट रोजी वितरित होणारा योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेतली. न्यायालयाने सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून, योजनेला दिलेल्या आव्हानाला फेटाळले आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले की, करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असं असू शकत नाही. “फी” आणि “कर” यामध्ये फरक असतो, आणि सरकारने बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय असेल तर त्याला आव्हान देणे योग्य ठरत नाही, असे मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सांगितले.

Majhi ladki bahin yojana विरोधात याचिका

नवीन मुंबईतील नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सांगितले की, धोरणात्मक निर्णयाला आव्हान देण्यासाठी एक आधारभूत मुद्दा असणे आवश्यक आहे आणि योजनेचा हेतू समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना लाभ पोहोचवणे असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

राज्य सरकारला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून योजनेच्या पहिल्या हप्त्याचा वितरण होईल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश

सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका

मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा

निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली

राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय