Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकोरोनाधक्कादायक: देशात 20 दिवसात 10 लाख कोरोना बाधितांची वाढ; एकूण 20 लाखाचा...

धक्कादायक: देशात 20 दिवसात 10 लाख कोरोना बाधितांची वाढ; एकूण 20 लाखाचा आकडा पार

नवी दिल्ली  : देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगात भारतात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या भारत जगात तिसऱ्या नंबर वर आहे. सध्या देशात एकूण 20,86,864 इतकी संख्या झाली आहे. त्यातील 42,578 इतक्या कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार वर टीका केली आहे.

देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 20 लाखाच्या पुढे गेल्या आहे, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे की, कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखाच्या पुढे गेली आहे आणि सरकार गायब झाल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या एका ट्विट ला टॅग केले आहे त्यात त्यांनी म्हंटले आहे की, 17 जुलैला 10 लाखाचा आकडा पार झाला आहे. जर कोरोनाचा असाच प्रादुर्भाव वाढत गेला तर 10 ऑगस्ट पर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 20 लाख होईल, सरकारला प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्या असे त्यांनी ट्विट केले होते.

देशात गेल्या चोवीस तासात 62,538 अशी संख्या वाढली आहे ही संख्या जगा मध्ये भारतात सर्वाधिक असून युएसए मध्ये 59,692 तर ब्राझील मध्ये 53,139 इतकी संख्या वाढली आहे. जगाची एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 कोटी 95 लाख 43 हजार 562 एवढी झाली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय